" सूर्यनमस्कार "


                 

कै. रसिका महाविद्यालय, देवणी  

क्रीडा विभाग 

कै. रसिका महाविद्यालय, देवणी जिल्हा - लातूर (महाराष्ट्र ) च्या क्रीडा विभागा मार्फत यानी सूर्यनमस्कार कसा करावा या प्रशिक्षणाचे व्हिडिओ तयार केले आहे. Lockdown  काळातील मिळालेल्या योग्य त्या वेळेचे उपयोग  करावे , चांगल्या सवयी चे पालन करावे शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त राहावे .


                        व्हिडिओ link- https://www.youtube.com/watch?v=gorDCi-sG6Q


" सूर्यनमस्कार "

       

         सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा संच आहे, जे शक्यतो सूर्योदयाच्या वेळी करावे. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होते. आपण निरोगी राहतो आणि आपण आजारांपासून दूर राहण्यात मदत होते. हृदय, यकृत, आतडी, पोट, छाती, घसा आणि पाय यांना सूर्यनमस्कारामुळे अनेक फायदे होतात. डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा सूर्यनमस्कारामुळे फारच मोठा फायदा होतो आणि म्हणूनच सर्व योग तज्ञ सूर्यनमस्कार करावे असे सुचवितात.


ते कधीही रिकाम्या पोटी करता येतात. परंतु सूर्यनमस्काराकरिता सकाळची वेळ उत्तम असे मानतात कारण त्यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि मनाला तजेला मिळतो ज्यामुळे दिवसभराची कामे करण्यासाठी आपण एकदम तयार होतो. जर दुपारी केली तर त्याने शरीराला ताबडतोब ऊर्जा मिळते आणि जर संध्याकाळी केली तर मन हलके होण्यात मदत होते. जर अतिशय वेगाने केले तर सूर्यनमस्कार हा हृदयाकरिता सर्वोत्तम व्यायाम आहे आणि वजन कमी करण्याचा चांगला उपाय.


  • मुलांनी सूर्य नमस्कार कां करावेत ?


सूर्यनमस्कारामुळे मन शांत होते आणि एकाग्रता सुधारते. आज मुले जीवघेण्या स्पर्धेला तोंड देत आहेत आणि त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सूर्यनमस्काराचा समावेश केला पाहिजे कारण त्याने मानसिक स्थैर्य वाढते, चिंता आणि अस्वस्थता कमी होते. सूर्य नमस्काराच्या नियमित सरावाने शरीराला शक्ती आणि जोम प्राप्त होतो. स्नायुंकरिता हा सर्वोत्तम व्यायाम असून याने भावी धावपटूंच्या पाठीच्या कण्याची आणि हातापायांची लवचिकता वाढते. ५ वर्षाचे लहान मुल दररोज सूर्यनमस्कार करू शकते.




  • महिलांनी सूर्य नमस्कार कां करावेत ?


असे म्हणतात की महिनोन महिने पथ्याआहाराने (डाएटिंग करून) जे होऊ शकत नाही ते सूर्यनमस्काराने होते. म्हणूनच  आरोग्याबाबत जागृत महिलांसाठी हे एक वरदानच आहे कारण त्याने जास्तीचे वजन तर घटतेच शिवाय हा एक सोपा आणि स्वत: करण्याचा उपाय आहे उदराचे स्नायू ताणून सुडौल बांधा मिळवण्याचा. काही सूर्यनमस्कारांच्या आसनामुळे पोटावरील चरबी कमी होते. त्यामुळे थॅायरॅाईड ग्रंथींना चेतना मिळते (यामुळे आपले वजन कमी करण्यात मोठा परिणाम होतो) याने ग्रंथी नीट कार्य करू लागतात. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीची अनियमितता दूर होते आणि बाळंतपणसुद्धा सुकर होते. सर्वात शेवटचे असे की याने चेहऱ्यावर तेज येते, सुरकुत्या येणे लांबते आणि चेहरा चमकतो आणि चिरतरुण दिसतो.


  • सूर्यनमस्कार करून आपली अंतःस्फूर्ती वाढवा


सूर्यनमस्कार आणि ध्यान यांच्या नियमित सरावाने सौर चेता जालीकेचा आकार बदामापासून वाढून हाताच्या तळव्याएवढा होतो. सौर चेता जालिका, जिला दुसरा मेंदू असेसुद्धा म्हणतात, आपल्यामध्ये अंतःस्फूर्तीची क्षमता आणि आपले विचार अधिक स्पष्ट आणि आपल्याला अधिक केंद्रित करते. सौर चेता जालीकेचे जर आकुंचन झाले तर त्यामुळे नैराश्या आणि इतर नकारात्मक प्रवृत्ती निर्माण होतात.


सूर्यनमस्काराच्या अनेक फायद्यांमुळे शरीर निरोगी आणि मन शांत राहण्यात मदत होते.म्हणूनच सर्व योग तज्ञ सूर्यनमस्काराचा मोठ्या प्रमाणावर पुरस्कार करतात.


  • विशेष आभार : आकाश घाडगे ( महाविद्यालयाचा योगाचा राष्ट्रीय खेळाडू )  

  • मार्गदर्शन / क्रीडा संचालक :- प्रा.डॉ.सचिन चामले


 दिनांक : 25 /07/2020 




Comments

Post a Comment